Breaking News

फलटण नगरपरिषदेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

79th Independence Day celebrated with enthusiasm in Phaltan Municipal Council

    फलटण फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ ऑगस्ट २०२५ - शुकवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन फलटण नगरपरिषदे मार्फत उत्साहात साजरा करण्यात आला.  स्वातंत्र्य दिनानिमित्त चे ध्वजारोहण निखिल बाजीराव मोरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी फलटण नगर परिषद जिल्हा सातारा यांनी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी केले. यावेळी फलटण नगरपरिषदेचे अधिकारी- कर्मचारी, फलटण शहरातील नागरिक, माजी सैनिक, वीर पत्नी, लोकप्रतिनिधी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र, व्यापारी बांधव, अबालबुद्ध इत्यादी उपस्थित होते. ध्वजारोहणा नंतर राष्ट्रध्वजाला सलामी देउन राष्ट्रगीत वाजविण्यात आले व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येउन राज्यगीत वाजविण्यात आले.

    यावेळी  मुख्याधिकारी यांनी आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करून, स्वातंत्र्य लढ्यात  सहभागी झालेल्या सर्वं महापुरुषांचे स्मरण केले आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले. उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रोत्साहित करून उपस्थित सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्मीण केले.

    स्वातंत्र्य दिनानिमित नगरपरिषदे मार्फत वृक्षारोपण करणात आले, वृक्षारोपणा दरम्यान  मुख्याधिकारी यांनी पर्यावरणाचे महत्व विषद करून, सर्वांना वृक्ष रोपण करण्याचे आवाहन केले. तसेच नैसगिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे हे आपले मुलभूत कर्तव्य असल्याचे सांगितले.

    समारंभा दरम्यान निवडक विद्यार्थी विद्याथिनींचे देशभक्तीपर गाणे ,भाषणे आयोजित करण्यात आली होती. फलटण नगरपरिषद शासकीय इमारतीवर व शहरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच देशभक्तीपर गाण्यांचा प्रचार करण्यात आला. फलटण नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत ऑपरेशन सिंदूर वर आधारित नाटक आयोजित करण्यात आले.

No comments