श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मुधोजी क्लब नूतनीकरणाचे भूमीपूजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ ऑगस्ट २०२५ - मुधोजी क्लबच्या नूतनीकरणाचा भूमीपूजन समारंभ गुरुवार दि.०७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी क्लबचे पदाधिकारी राजीव नाईक निंबाळकर, हेमंत भोसले, डॉ. महेश बर्वे, नितीन भैय्या भोसले, महादेव माने, समर जाधव विश्वस्त, बाळासाहेब बाबर उपस्थित राहणार आहेत.
No comments