Breaking News

स्मार्ट प्रीपेड मिटर बसवण्यास जाधववाडी ग्रामस्थांचा विरोध

Jadhavwadi villagers oppose installation of smart prepaid meters

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ ऑगस्ट २०२५ - जाधववाडी (फ) गावामध्ये महावितरणचे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची योजना चालू आहे, मात्र जाधववाडी येथील सर्व सदनिका धारकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास विरोध केला असून, त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी महावितरण कंपनीला निवेदन देऊन स्मार्ट मीटरला विरोध केला आहे तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    जाधववाडी ग्रामस्थांकडून महावितरण ला देण्यात प्रसंगी जाधवाडीचे उपसरपंच दीपकराव सपकळ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.  निवेदनात असे म्हटले आहे की, जाधववाडी गावच्या संमतीशिवाय व माहिती न देता, स्मार्ट मीटर हुकूमशा पद्धतीने गावांमध्ये बसवण्याचे काम सुरू आहे, ते काम तात्काळ थांबवावे आणि नागरिकांना संपूर्ण माहिती द्यावी. नागरिकांची फसवणूक करू नये अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

    ही समस्या जाधववाडी पूर्ती न राहता अनेक ठिकाणी दिसून येत आहे, त्यामुळे राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला विरोध होत आहे,  वीज दरवाढीसह अनपेक्षित वीज बिल येण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला विरोध करण्यात आला आहे.

No comments