Breaking News

सासकल येथे शेतकरी दिन साजरा ; कृषी विभागाच्या योजनेच्या क्यूआर कोडचे अनावरण

 

Farmers' Day celebrated at Saskal; QR code of Agriculture Department's scheme unveiled

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० ऑगस्ट २०२५ - पद्मश्री  डॉ. विठ्ठल विखे पाटील जयंतीचे औचित्य साधून शेतकरी दिन साजरा करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या योजनेच्या क्यूआर कोडचे अनावरण तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी पुरस्कार प्राप्त शेतकरी बबन मुळीक उप कृषी अधिकारी विडणी अजित सोनवलकर तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सासकल  जाधव तसेच प्रगतशील शेतकरी नामदेव मुळीक, पोपट घोरपडे,तुकाराम मुळीक विकास मुळीक,हनुमंत मुळीक, मनोहर मुळीक कृषी सखी शिवाली  जगदाळे, कोमल मुळीक आदी उपस्थिती होत.

    यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी शाश्वत शेती राष्ट्रीय नैसर्गिक शेती तसेच फळबाग लागवड व फुल शेती विषयी मार्गदर्शक केले. विषमुक्त अन्नधान्य उत्पादन करणे बाबत यावेळी दत्तात्रय गायकवाड यांनी आवाहन केले. 

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक  सचिन जाधव यांनी केले, तसेच हंणमत मुळीक यांनी  आभार मानले. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार प्राप्त शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांच्या फळबागेला प्रशेत्र भेट देण्यात आली.

No comments