मराठा - ओबीसी दंगल लावण्याचा फडणवीसांचा डाव - मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ ऑगस्ट २०२५ - मराठा व ओबीसी दंगल लावण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी आखला असून त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, मराठा व ओबीसी आम्ही दोघे बांधावर राहतो, त्यामुळे ओबीसीत लागणार नाही असे मत मनोजदादा जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
दि.२९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील सजाई गार्डन या ठिकाणी अखंड मराठा समाजाची बैठक मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने आयोजित केली होती, यावेळी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल सांगितले की, ओबीसी समाजाला घेऊन महाराष्ट्राच्या खर्चावर ओबीसीच्या नेत्यांना गोव्यामध्ये नेले आणि समुद्राच्या कडेने फिरवले आणि परत महाराष्ट्रात आणले त्यांचा मराठा ओबीसी मधील वाद वाढवण्याचा हेतू असून, त्यांचा हेतू कधीही सफल होणार नाही,उलट मराठा ओबीसी वाद लावणाऱ्या फडणवीसांनी ओबीसीसाठी तरी काय केले असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अडचणीत येणार आहेत,आमचा डीएनए ओबीसींचा असल्याचे ठासून सांगणाऱ्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, तुमची मुलेबाळे मोठी होऊ नयेत, त्यांना नोकऱ्या मिळू नयेत तसेच तुमचा फक्त राजकारणासाठी वापर सुरू केला असून, आता त्यांनी ओबीसींना घेऊन गोव्याला अधिवेशन घेतले अन् तुमच्या महाराष्ट्राचा खर्च केला असून, आता त्यांची सगळीच कामे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून सुरू आहेत असे जरांगे पाटील यांनी सांगितले, फडणवीसांनी कधी दलीत मुस्लिम वाद लावला तर कधी धनगर समाजाचा वाद निर्माण केला परंतु आता त्यांचा डाव मराठ्यांनी ओळखला असून, पश्चिम महाराष्ट्रातील आता एकही मराठा घरी बसणार नाही, उलट आता नुकतेच ओबीसींचे अधिवेशन घेऊन मराठ्यांना डीवचण्याचा प्रयत्न केला असल्याने भाजपासह सर्वच पक्षातील मराठा नेत्यांनी चलो मुंबईचा नारा दिला असून, प्रत्येकाने मोटारसायकल असो की चार चाकी असो कुटुंबातील सर्व सदस्य मुंबईला येण्यासाठी उत्सुक झाले असून, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे घाण विचारांचे असून त्यांनी मराठा समाजाला संपविण्याचा घाट घातला आहे, परंतु आता संपुर्ण महाराष्ट्रातील मराठे एकवटले आहेत, व येणाऱ्या 29 ऑगस्टला कोट्यवधी मराठे मुंबईत धडक देणार आहेत व आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान फलटण येथे मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला संपविण्याचा घाट घालीत आहेत, मात्र आता त्यांची कूटनीती सर्वच पक्षातील मराठा नेत्यांना लक्षात आली आहे, त्यामुळे सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते गावागावात, शहराशहरात तसेच तालुक्यातील जनता आता मुंबईच्या लढ्यासाठी कोटींच्या संख्येने दाखल होणार आहे.
देवेंद्र फडणवीस तुमचे मराठ्यांनी काय नुकसान केले आहे, सत्तेतील मराठ्यांनी आता शहाणे व्हावे, फडणवीस तुमच्या मुलांना औषध घालून मारण्याची तयारी फडणवीस करीत आहेत,तुमची लेकर मोठी झाली नाहीत पाहिजे, नोकरीला लागली नाहीत पाहिजे,असा त्यांचा डाव आहे, फडणवीस सांगत आहेत की, मला ओबीसींसाठी लढायचे आहे परंतु मराठ्यांसाठी का लढायचे नाही, हे फडणवीसांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे, त्यामुळे आता मराठा समाज पेटून उठला आहे, त्यामुळे येणाऱ्या 29 ऑगस्टला मुंबईत मराठ्यांच वादळ धडकणार असून आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
पत्रकारांनी विचारले की धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे पाटील यांनी सांगितले की, अजितदादा काय पण फडणवीस सुद्धा त्यांना मंत्रिपद देऊ शकणार नाहीत, अन् दिले तर मग त्यांना नक्कीच पाश्चाताप होईल असे सांगत धनंजय मुंडे आपल्या भावाच्या मृत्यू होऊन सुद्धा भावजयीला न्याय देऊ शकले नाहीत तर संतोष देशमुख खुनात सुद्धा त्यांनी अनेक कॉल केले असल्याचे संतोष देशमुख यांच्या भावने सांगितले आहे.
No comments