Breaking News

फलटणमध्ये ७० वर्षांच्या चिंचेच्या झाडाची कत्तल ; प्रशासन कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष

70-year-old tamarind tree cut down in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ ऑगस्ट २०२५ - बारस्कर गल्ली, शुक्रवार पेठ येथे तब्बल ७० वर्षे जुने व डेरेदार चिंचेचे झाड तोडण्यात आले. परिसरातील काही रहिवाशांनी झाडाच्या फांद्या त्यांच्या घरावर येत असल्याचे कारण देत ही कत्तल केली. झाडाचे वय, आकारमान आणि परिसरातील पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता हे झाड विशेष ठरले होते. मात्र, त्याच्या फांद्यांमुळे संभाव्य धोका असल्याचे सांगत काही स्थानिकांनी ते हटवण्याचा निर्णय घेतला.

    झाड तोडत असल्याची माहिती मिळताच नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन झाड वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.

    या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु, वनखात्याने हे झाड त्यांच्या हद्दीत नसल्याचे सांगत नगर पालिकेच्या हद्दीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता नगर पालिकेचे अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून, शहरातील जुन्या झाडांचे संवर्धन व देखभाल याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

No comments