Breaking News

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णु शिंदे यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान

 

Guardian Minister Shambhuraj Desai honours Vishnu Shinde of District Information Office as an excellent employee

    सातारा दि. 1 :   जिल्हा माहिती कार्यालय   वाहन चालक विष्णू पांडुरंग शिंदे  यांनी आपल्या 35 वर्षाच्या सेवा कालावधीत आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडल्या. याशिवाय छायाचित्रण, चित्रीकरण असे अन्य विशेष कामकाजही अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळले आहे. त्यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींशी अत्यंत चांगला जनसंपर्क जपला व शासकीय कार्यक्रम योजना, ध्येय धोरणे, यशकथा यांची सर्वदूर प्रसिद्धी करण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले.

    1 मे महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनानिमित्त श्री. शिंदे यांनी  अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने व कर्तव्यदक्षपणे बजावलेल्या सेवेकरिता   उत्कृष्ट कर्मचारी  म्हणून  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

    यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी,  कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

No comments