सौ.वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे सन १९९४ च्या १० वी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ मे - सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील दहावी बॅच 1993-94 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सुरवडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील प्राईड इलाईट हॉटेलमध्ये उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
या कार्यक्रमास शाळेतील माननीय शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रमुख उपस्थित शिक्षकांमध्ये श्री. लोहार सर, श्री. मोहिते सर, श्री. ननवरे सर, श्री. मदने सर, श्री. सुनील शिरसागर सर, श्री. सस्ते सर, श्री. भोसले सर, श्री. यादव सर, श्री. भिसे सर आणि श्री. ठोंबरे सर शहा मॅडम यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये नवे प्रेरणास्त्रोत व उत्साह संचारला.
कार्यक्रम खेळीमेळीच्या आणि आनंदी वातावरणात पार पडला. विशेषतः देश-विदेशातून आवर्जून आलेल्या माजी विद्यार्थिनींच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. सर्व उपस्थितांचे आयोजकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला तसेच देशसेवेतील (आर्मी, पोलीस सेवा) माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. काही दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या स्नेहमेळाव्यास एकूण 76 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध प्रकारचे गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन श्री. विक्रम सपकाळ, श्री. महेश राजपूत, श्री. आदेश जमदाडे, श्री. संतोष शिंदे, श्री. तुषार मगर आणि श्री. विलासराव लोखंडे यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व अथक परिश्रमांमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आयोजक समितीचे मनःपूर्वक आभार मानले.
No comments