सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयूताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजयदादा व विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती दौरा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ - फलटण तालुक्यातील सुरवडी गणात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पार्टी (भाजप) व महायुतीच्या वतीने धनंजय दादा साळुंखे–पाटील यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळत असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ. विमलताई साळुंखे–पाटील व सौ. शरयू साळुंखे–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या प्रचार मोहिमेमुळे जनतेमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे.
या प्रचार मोहिमेला माजी खासदार श्री. रणजित दादा नाईक निंबाळकर, लोकप्रिय आमदार श्री. सचिन पाटील साहेब, जेष्ठ नेते प्रल्हादराव (तात्या) साळुंखे–पाटील आणि महिला नेत्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर वहिनीसाहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.
या मोहिमेत धनंजय दादांच्या पत्नी सौ. ज्योत्ना वहिनीसाहेब साळुंखे–पाटील तसेच संपूर्ण साळुंखे–पाटील कुटुंबाने सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी थेट संवाद साधला आहे.
घाडगेमळा, घाडगेवाडी, ढवळेवाडी, नांदल, निंभोरे, मिरगाव, मुळीकवाडी व वडजल या गावांमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी सांगितले की, नीरा–देवधर आणि धोम–बलकवडी कालव्यांमुळे या भागातील पाणीप्रश्न आदरणीय माजी खासदार श्री. रणजित दादा यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुटला असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
या महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून शेती उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे यावेळी मतदार भाजप व महायुतीसोबत ठामपणे उभे राहणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
माजी खासदार श्री. रणजित दादा व आदरणीय तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा, शेती विकास व ग्रामीण समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत.
विकासकामांची माहिती देत व भविष्यातील योजनांचा आढावा घेत मतदारांचा विश्वास अधिक दृढ करण्यात आला. त्यामुळे सर्वच गावांमध्ये धनंजय दादांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे.
महिला, युवक, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजघटकांकडून या प्रचार मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. येणाऱ्या निवडणुकीत धनंजय दादांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ, युवक आघाडी व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण सुरवडी गणात भाजप व महायुतीच्या प्रचाराचा झंझावात निर्माण झाला असून निवडणूक वातावरण तापले आहे.

No comments