Breaking News

साखरवाडी गटाचा उमेदवार रामराजेंचा मोठा लाभार्थी ; जे आमचे होऊ शकले नाहीत ते त्यांचे काय होणार? - सागर कंबळेना संजीवराजे यांचा टोला

Sakharwadi group candidate is a big beneficiary of Ramraje; What will happen to those who could not become ours? - Sagar Kambala's Sanjeevraje's Tola

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ३१  जानेवारी २०२६ -साखरवाडी जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले उमेदवार हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे लाभार्थी होते, ते जेव्हा पंचायत समितीला निवडून आले, तेव्हा ते आर्थिक अडचणीत आले होते, तेव्हा रामराजे व इतर लोकांनी मदत करीत त्यांना अडचणीतून बाहेर काढले, केलेली मदत विसरून ते दुसऱ्या गटात गेले, जे आमचे होऊ शकले नाहीत, ते त्यांचे काय होणार? असा टोला सागर कांबळे यांना मारत, जिल्हा परिषद साखरवाडी गटाच्या उमेदवार श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर व सस्तेवाडी पंचायत समितीचे उमेदवार गणेश तांबे यांना विजयी करण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    सातारा जिल्हा परिषद साखरवाडी गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर व सस्तेवाडी पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार गणेश तांबे यांच्या प्रचारार्थ चौधरवाडी येथे झालेल्या कोपरा सभेत, श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्माताई भोसले,श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर व सस्तेवाडी पंचायत समितीचे उमेदवार गणेश तांबे यांच्यासह चौधरवाडी येथील जेष्ठ व युवानेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आपली ताकद उभी करायची असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर झेंडा फडकवयाचा आहे, आता आपण शिवसैनिक आहात, आता कोण आडवा येईल त्याला आता सरळ करायची ताकद आपल्यात आहे, यामुळे अस्थिर राजकारण स्थिर करण्यासाठी तसेच येणारी वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी आपल्याला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साखरवाडीचा कारखाना पुन्हा उभारला दराची कोंडी दत्त इंडियाने फोडली म्हणून त्यांना फोन यायला लागले व तुम्ही एवढा दर का देताय असे दबाव येत आहेत. विकासाची घडी विस्कटू देऊ नका, आता कोणत्याही संस्था बिघडू देऊ नका, ही प्रवृत्ती तालुक्यात वाढू देऊ नका, विकासकामात कमी पडनार नाही आम्ही कामांचे बोर्ड लावले असते तर तुम्ही बोर्ड पाहून कंटाळला असता, आता मागे पुढे न पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवा असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी उत्तम चौधरी,हेमंत भोसले, मुकुंद धनवडे,डॉ.रवींद्र घाडगे,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments