Breaking News

ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे आज मंगळवारी जाहीर सभा

Rural Development Minister Jaykumar Gore will hold a public meeting in Vidani today, Tuesday.

   फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ - विडणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ.सुषमाताई अविनाश मोरे व विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन गजानन अभंग (अध्यक्ष) व सांगवी पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सारिका संजय सोडमिसे यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर मंदिर चौक विडणी येथे, ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची तोफ मंगळवार दि.3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली असून, या सभेला माढा लोकसभा मतदार संघांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटण पालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार असून, या जाहीर सभेला विडणी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सागर अभंग यांनी केले आहे.
      विडणी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवार सौ. सुषमाताई मोरे व सचिन अभंग (अध्यक्ष) तसेच सौ. सारिका सोडमिसे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघरच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला, तसेच आळंदी पंढरपूर व फलटण बारामती रस्ता त्याचबरोबर होणारी नाईकबोमवाडी एमआयडीसी मध्ये येणाऱ्या मोठ्या कंपन्या व या ठिकाणी होणारे रोजगार याचा फायदा तरुण वर्गाला होणार आहे.
     सातारा जिल्ह्यातील सर्वात विकासमय विडणी चा लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केलेला विकास व त्या ग्रामीण भागाला दिशादर्शक असे गाव व गावाचा विकास आज संपूर्ण महाराष्ट्र भर चर्चा होते अशा गावात ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे येणार असल्याने विडणी येथे जाहीर सभेची जोरदार तयारी केली जात आहे.

No comments