Breaking News

'यांनी' युवापिढी देशोधडीला लावली ; मात्र त्यांचा 'सातबारा' वाढला - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडेंवर घणाघात

They made the youth generation to flee the country but their numbers increased? - Sarpanch Sagar Abhang's attack on Dr. Balasaheb Shende

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - युवा वर्गाचा उपयोग राजकारणासाठी करता, कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभं करता, त्यांच्या जमिनीवर आपल्याच पतसंस्थेचे कर्ज देत बोजा चढवता अन त्यांना देशोधडीला लावता. एवढीच राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही.तुम्ही केलेला सर्व भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. आमच्या उमेदवाराला गावाचा गडी म्हणता, हो आम्ही आहोतच जनतेचे गडी तुमच्या सारखे घरगडी नाही. तुमचे राजकारण आता विडणीच नाही तर या पंचक्रोशीतील लोकांनी ओळखले आहे. लोकांच्या जमिनी कमी झाल्या, मात्र तुमचा सातबारा कसा वाढला, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. ही तुमची राजकराणातली शेवटची निवडणूक आहे, या निवडणुकीत तुमचा दारुण पराभव होऊन, तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा घणाघात विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर नाव न घेता केला.

    विडणी गटाच्या उमेदवार सौ. सुषमाताई मोरे व विडणी गणाचे उमेदवार सचिन अभंग (अध्यक्ष) यांच्या प्रचारार्थ विडणी येथील खंडोबा मंदीर परिसरात झालेल्या कोपरा सभेत अभंग बोलत होते. यावेळी अनिल शेंडे, अविनाश मोरे, शरद कोल्हे व इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना सागर अभंग यांनी सांगितले की, ही निवडणूक भविष्य कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवण्याची आहे,आता मतभेद करून चालणार नाही,सरपंच नाही तर त्याच्या मागची फौज महत्वाची असते, खासदार आमदार व मार्गदर्शक असतील चुकीचं काम केले नाही, तीन वर्षात एकही काम चुकीचं केल नाही,दलित वस्तीचा निधी इतरत्र नेला दलित वस्ती काय पाकिस्तानात आहे का?स्ट्रीट लाईट लोकवर्गणी मधून तसेच काय अगदीच खिशातून विकास केला आहे,परंतु विरोधकांनी आपल्या पतसंस्थेचा बोजा टाकायचा व गावातली चांगली लोकांना राजकारणात आणायचं अन त्यांना उध्वस्त करायची यांचा एक कलमी कर्यक्रम असतो कुटुंब देशोधडीला लावने,आत्तापर्यंत दारू मटण देऊन तरुणांना झुलवत ठेवले, महिलांना काय दिले, महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत आहे आम्ही गुढी उभारली, महिलांच्या उपस्थितीत गणपती बसवतो विसर्जन मिरवणूक काढतो, वचनालयातून तीस अधिकारी घडले,बरड वरून असलेली लाईट जात होती, त्यासाठी आम्ही कोळकीतुन लाईट आणली , आता विडणी येथे स्वतंत्र सब स्टेशन होत आहे, त्यासाठी जागा खरेदी केली आहे, आत्तापर्यंत विकास का झाला नाही,असा सवाल विरोधकांना विचारीत त्यांच्या कारभाराचा जाहीर पंचनामा केला.

    तुमच्या बरोबर असलेल्या लोकांचा सात बारा कमी झाला, ते देशोधडीला लावले, परंतु यांचा सात बारा वाढला, एक कोटी अडतीस लाख रुपये कोणी भ्रष्टाचार केला, त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे, त्या शिवाय गप्प बसणार नाही, रुग्णसेवा नाही यांनी धंदा केला, दादांना खरी श्रद्धांजली वाहीची आहे,श्रद्धांजली कार्यक्रमाला यांनी बहिष्कार घातला, ज्यांच्या जिवावर राजकारण केले,ते दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले नाहीत .  

    राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही, विकास करण्यासाठी आलो आहे. भविष्य कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे.प्रश्न उत्तरे काय विचारता?विकास केलाय म्हणून मते मागतोय,विडणी आता महाराष्ट्रात वेगळी असेल,तुमच्या मताची किंमत दाखवून दिली आहे. तीनच वर्षात,कामाची उदघाट्न करून थकलो,परंतु नागरिकांना मान सन्मान देण आमच कर्तव्य आहे असे सागर अभंग यांनी सांगितले.

    अध्यक्ष आपण गडीच आहोत,याची आडवा त्याची जिरवा असे आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितले नाही, यांनी समाजात भांडणे लावली, सातारा जिल्ह्यात कार्यालय नसेल असे कार्यालय केले आहे,वाचनालय,सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, आपल्याकडे इतर गावातील मुले अभ्यासाला येत आहेत, मी मोडेन परंतु वाकणार नाही,विकासाचा रथ पुढे घेऊन चाललोय,जनसंपर्क कार्यालयात सर्व मोफत सुविधा दिल्या आहेत.

    तब्बल 400 रेशन कार्डचा विषय मार्गी लावला,ग्रामविकास मंत्री आमचे आहेत,200 कोटी रुपये मिळणार आहेत यामुळे विडणी गटाचा व गणाचा विकास करायचा आहे यांनी आत्तापर्यंत पैसे बरड ला वापरले,परंतु आपल्याला गणाचा अन गटाचा विकास करायचा असेल तर या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी स्पष्ट केले यावेळी विडणी येथे झालेल्या कोपरा सभेला युवक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    विकासाचा सर्व आलेख कागदोपत्री दाखवत  भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय अभंग यांनी दुध का दुध पाणी का पाणी केले. गावासाठी केलेल्या विकास कामांची यादीच त्यांनी जाहीर केली. आणि कधीही समोरासमोर चर्चेला या, पुराव्यासह तुम्हाला विकास कामे दाखवतो असे आव्हान विरोधकांना दिले.

No comments