Breaking News

विमान अपघातात वीरमरण आलेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची रामराजेंनी घेतली भेट ; दुःखात दिला आधार

Ramraje met the family of Videep Jadhav, who died in a plane crash; provided support in their grief

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१ - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या भीषण विमान अपघातात तरडगाव (ता. फलटण) येथील सुपुत्र तथा मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सुरक्षारक्षक विदीप दिलीप जाधव (वय ३७) यांना वीरमरण आले. या दुर्दैवी घटनेनंतर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

    या भेटीदरम्यान श्रीमंत रामराजेंनी विदीप जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ही घटना अत्यंत वेदनादायक असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असल्याचे त्यांनी सांगितले. जाधव कुटुंबीयांच्या दुःखात आपण पूर्णपणे सहभागी असून, पुढील काळात कोणतीही मदत लागल्यास थेट संपर्क साधावा, असे आश्वासनही त्यांनी दिले.

    कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विदीप जाधव यांच्या शौर्याला कायम स्मरणात ठेवले जाईल, असे रामराजे यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या निधनाने कुटुंबासह तरडगाव परिसरावर मोठा आघात झाला असून, सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments