ज्यांनी 30 वर्षांत काहीच विकास केला नाही ते पुढे काय विकास करणार - ॲड.जिजामाला नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१ - महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी, तसेच आपल्या ग्रामीण भागातील विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना कायम सुरू ठेवण्यासाठी,महाराष्ट्राला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी तसेच विविध योजना राबविण्यासाठी या लाडक्या बहिणींना आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासासाठी आपल्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस निधी देतात तरी दादांनी उभा केलेले बरड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे व दुधेबावी गणाच्या उमेदवार मनीषाताई सोनवलकर यांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन करतानाच, ज्यांनी 30 वर्षांत काहीच विकास केला नाही ते पुढे काय विकास करणार असा टोला राजेगटाला माजी जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.
बरड गटाचे जिल्हा परिषद उमेदवार भाऊसाहेब मोरे व पंचायत समिती दुधेबावी गणाच्या उमेदवार मनीषाताई सोनवलकर यांच्या प्रचारार्थ महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, आपल्या फलटण तालुक्याचा गेली तीस वर्षे विकास थांबला आहे, विकास पुन्हा सुरु करण्यासाठी आता आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घ्यायची असून, दिलेले उमेदवार हे आपल्या सुख दुःखात नेहमी सहभागी असतात असेच उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीत जाणे गरजेचे आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून नीरा देवघरचा प्रश्न मार्गी लावला असून आता लवकरच पाणी शेतकऱ्यांच्या बांधपर्यंत पोहोचणार आहे, चार माही असलेले कालवे आता बारमाही झाले आहेत त्यामुळे तसेच रस्ते,ग्रामीण भागातील जलजीवन योजना मार्गी लावल्या आहेत.
आता आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाचा फडकवायचा असल्यामुळे भाऊसाहेब मोरे व मनीषा ताई सोनवलकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments