ऑलिंपियाड राज्यस्तरीय परीक्षेत आयुष तोरणे राज्यात २२ वा तर मुंबई जिल्ह्यात प्रथम
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) फलटण येथील निवृत्त पाटबंधारे अधिकारी बी.एम.बार्शीकर यांचा नातू व सौ. सोनाली व अभिजित तोरणे यांचा मुलगा आयुष याने एमटीएस ऑलिंपियाड राज्यस्तरीय परीक्षा २०२४-०२०२५ मध्ये चांगले गुण मिळवत राज्यात २२ वा क्रमांक मिळवला आहे तर मुंबई जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आयुष हा घाटकोपर, मुंबई येथे विद्याभवन प्राथमिक शाळेत इयत्ता ४ मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments