मतदारांनी मतदानाद्वारे विरोधकांना दाखवून द्यावे...- श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजे गटाच्या चार जागा या बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यामुळे मतदारांनी, आता निवडणुकीत काही राहिले नाही, विजय समोर दिसत आहे, असा विचार न करता, सर्व मतदारांनी बाहेर पडून छत्री या चिन्हाला मतदान करावे व मतदानाद्वारे विरोधकांना दाखवून द्यावे, किरकोळ उमेदवारांनी परत बाजार समितीला निवडणूक खर्चात न पाडता मार्केट कमिटीची निवडणूक बिनविरोध व्हावी व शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांसाठी तयार व्हावी असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवाहन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

No comments