Breaking News

२ खून प्रकरणातील फरार आरोपीस पकडण्यात फलटण शहर पोलिसांना यश

Phaltan city police succeeded in arresting the absconding accused in 2 murder cases

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - दोन खून प्रकरणासह आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी रोशन अविनाश उर्फ  ॲडीसन भोसले हा सन २०१९ पासून फरार होता, त्यास फलटण शहर पोलिसांनी सातारा येथे अटक केली आहे. त्यास फलटण येथील न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने त्यास ३ मे २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहितीनुसार  फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२५/२०२० भा.द.वि.सं. कलम ३०२, ३०७. २०१, ४५२. १४३, १४७, १४८, १४९, १८८, आर्म्स ॲक्ट कलम ४ २५. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (बी) या गुन्ह्यातील आरोपी नामे रोशन अविनाश ऊर्फ ॲडीसन भोसले रा. इंदीरानगर झोपडपट्टी अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर हल्ली रा. कापशी ता. फलटण जि. सातारा हा दिनांक २७/४/२०२३ रोजी सातारा सेशन कोर्ट येथे येणार असल्याबाबत, पोनि श्री शंकर पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत समजल्याने, त्यांनी वरिष्टांचे मागदर्शनाखाली, सदर आरोपीस पकडण्याची योजना आखली व त्याची अंमलबजावणी करणेकामी पैरवी अधिकारी स.पो. फौ. संजय पाटील सातारा सेशन कोर्ट, स.पो. फौ. संतोष कदम, पो.हवा. चंद्रकांत धापते, पो.कॉ. काकासाहेब कर्णे यांचे पथक पो.उ.नि. श्री सुरज शिंदे यांच्या अधिपत्याखाली तयार करून, त्यांना सातारा येथे रवाना केले. दिनांक २७/४/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजताचे सुमारास आरोपी रोशन अविनाश भोसले हा वरील नमुद पथकास सातारा सेशन कोर्ट ते आर. टी. ओ. ऑफिस सातारा येथे रस्त्याने जाताना दिसल्याने, सदर आरोपीस नमुद पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शिताफीने पकडुन ताब्यात घेतला. त्यानंतर त्यास फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले व त्याचेकडे कसून  तपास केला असता, सदरचा आरोपी हा फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ११७/२०१९ भादवि. ३०२, ३०७ १४३, १४७, १४८, १४९ मध्ये गुन्हा घडलेपासुन फरारी आहे असे लक्षात आले. आरोपीस गुरनं ३२५ / २०२० या गुन्ह्यात अटक केली असुन, तपास सपोनि श्री नितीन केणेकर हे करीत आहेत. त्यांनी सदर आरोपीस श्रीमती ढवळे कोर्ट प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी फलटण न्यायालय येथे हजर ठेवले असता,  कोर्टाने आरोपीची दिनांक ३/५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर केलेली आहे.

सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक, सातारा श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तानाजी बरडे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शंकर पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन केणेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री सुरज शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष कदम, पो. हवालदार चंद्रकांत धापते, पो नाईक नितीन भोसले, पो. कॉन्स्टेबल काकासो कर्णे यांनी केली आहे.

No comments