फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीत युवक - युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपारिक जयंती निमित्त फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने फलटण शहरातून आज बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या बाईक रॅलीमध्ये युवक - युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली शांततेत व शिस्तबद्धरीत्या संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज की, जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, सर्व वातावरण शिवमय झाले होते.



No comments