फलटण इदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण
![]() |
| फलटण येथे इदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करताना मुस्लिम बांधव (छाया - नजीर काझी ) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - शहरातील इदगाह मैदान येथे, मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज अदा करून, एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत, ईद उत्साहात साजरी केली.
शनिवार दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता फलटण येथील ईदगाह मैदान, मलठण येथे ईद उल फितर ची नमाज अदा करण्यात आली. नमाजचे पठण फलटण येथील रियाज काझी यांनी केले. त्यापूर्वी फलटण येथील फारुख काझी यांनी सर्व लोकांना मार्गदर्शन केले. येथे नमाज मॅनेजमेंट ची जबाबदारी काझी यांच्यावर असते. त्यामध्ये नझीर काझी, रिजवान काझी, (लल्लू) हाफिज काझी व मुसा काझी व रियाज लतीफुद्दीन काझी यांची व्यवस्थापन कमिटी आहे. या ईद ची नमाज व्यवस्थापनासाठी येणारा सर्व खर्च कमिटी करत असते. या नमाज साठी फलटण आणि आजूबाजूतील परिसरातून चारशे ते पाचशे लोक ईदगाह मैदानावर जमा झाले होते.

No comments