मोफत श्रमिक कार्ड सेवेचा लाभ घ्यावा - अनुप शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ एप्रिल - - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने फलटण शहरातील प्रभाग क्रमांक १० व ११ मधील नागरिकांसाठी मोफत श्रमिक कार्ड काढून देण्याचे काम सुरू करण्यात आले असून याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजना पैकी एक असंघटित कामगारांसाठी श्रमिक कार्ड ही योजना असून १६ ते ६० वयोगटातील सर्व नागरिकांचे सदरचे श्रमिक कार्ड मोफत काढून देण्यात येत असून, रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये सदरचे कार्ड काढून देण्यात येत आहे, श्रमिक कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोबत आधार कार्ड, बँक पासबुक व आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल घेऊन यायचे आहे. सदरचे कार्ड काढणार्या व्यक्तीस दोन लाखाचा विमा मोफत मिळत असून इतरही अनेक फायदे मिळत आहेत, तरी नागरिकांनी मोफत श्रमिक कार्ड सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अनुप शहा यांनी केले आहे.
No comments