फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
फलटण(गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - फलटण तालुक्यातील युवा नेते सह्याद्री चिमणरावजी कदम (भैय्यासाहेब) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद (आबा ) पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री), नितीन काका पाटील (राज्य सभा खासदार),
सचिन कांबळे पाटील (आमदार फलटण कोरेगाव), बाळासाहेब सोळसकर (अध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अ. प. गट), शिवरूप राजे खर्डेकर (फलटण तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अ. प. गट ) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी बोलताना सह्याद्रीभैय्या कदम म्हणाले की, समाजसेवा, विकासाभिमुख राजकारण आणि युवकांना संधी देणारी भूमिका यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनीही सह्याद्रीभैय्यांचा पक्षामध्ये योग्य सन्मान केला जाईल असे आश्वासन दिले. सह्याद्रीभैय्यांच्या प्रवेशाने आमची फलटण तालुक्यातील ताकद नक्कीच वाढली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास सह्याद्री भैय्यांना मानणारे फलटण तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, फलटण तालुक्यातील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments