Breaking News

साखरवाडी येथे ॲड.जिजामाला यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व भूमिपूजन

Inauguration and foundation stone laying ceremony of various development works at Sakharwadi under the auspicious hands of Adv. Jijamala

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ जानेवारी २०२६- आज साखरवाडी, ता. फलटण येथे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, साखरवाडी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ व भूमिपूजन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम ॲड.जिजामाला नाईक निंबाळकर वहिनी साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

    यामध्ये शासकीय दवाखान्यासाठी नूतन इमारत बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारणी, तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे यांसह अनेक विकासकामांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे साखरवाडी ग्रामस्थांना आरोग्य, स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे.

    या प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. प्रल्हादतात्या साळुंखे पाटील, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. उषाताई राऊत, युवा नेते श्री. अमरसिंह नाईक निंबाळकर, श्री. विक्रमसिंह (आप्पा) पांडुरंग भोसले (माजी सरपंच, साखरवाडी ग्रामपंचायत) यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

    तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, साखरवाडी परिसरातील महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या विकासकामांचे स्वागत केले. कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी साखरवाडीच्या विकासासाठी सुरू असलेल्या व आगामी काळातील योजनांबाबत समाधान व्यक्त केले.

    या विकासकामांमुळे साखरवाडी गावाचा सर्वांगीण विकास वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments