आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून स्वप्नील जावळे यास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - दि.२८/१२/२०२५ रोजी रात्री १०.३० वा.चे सुमारास हरिबुवा मंदिरासमोर, मलटण, ता. फलटण. जि. सातारा येथे फिर्यादी स्वप्नील गुलाब जावळे यांना, रोहीत सपकाळ व त्याचे अन्य साथीदार अक्षय खरात, उद्धव जगताप सर्व रा. पवारगल्ली, फलटण ता. फलटण जि. सातारा यांनी स्वप्नील गुलाब जावळे यांचे गाडीजवळ जाऊन, रोहित सपकाळ याच्या बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून, स्वप्नील गुलाब जावळे याला जातीवाचक शिवीगाळ करून, लोखंडी रॉडने व दांडक्याने मारहाण करून रोहित सपकाळ व त्याचे अन्य साथीदार यानी फिर्यादी स्वप्नील गुलाब जावळे यांस शिवीगाळ दमदाटी करून जखमी केलेने १. रोहित किसन सपकाळ, २. अक्षय खरात, ३. उद्धव जगताप सर्व रा. पवारगल्ली, फलटण ता. फलटण जि. सातारा यांचे विरूद्ध फलटण शहर पोलीस ठाणेस गु.नॉ.क्र.०५/२०२६ भा.न्या. संहि. कलम ११५ (२),११८(१),३५२,३५१ (२) (३), ३ (५) अनु.जा.ज.प्रति का. कलम ३ (१) (r) (S), ३ (२) (va), ६ प्रमाणे दि.०५/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण हे करीत आहेत.

No comments