फलटण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन क्षीरसागर यांची निवड
Sachin Kshirsagar elected as the president of Phaltan Taluka Talathi Association
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ - फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेची सन 2025 ते 30 ची नूतन कार्य करण्याची निवडणूक मंगळवार दि.23 डिसेंबर रोजी पार पडली,या मध्ये नूतन अध्यक्ष म्हणून सचिन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीने प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर तहसीलदार डॉ.अभिजित जाधव तसेच इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
पुढील प्रमाणे ही कार्यकारणी निवडली गेली, त्यामध्ये अध्यक्ष पदी सचिन नारायण क्षीरसागर,उपाध्यक्षपदी दीपक शिवाजी नलगे, कार्याध्यक्षपदी संतोष यशवंत पुंडेकर,स रचिटणीसपदी संदीप रामचंद्र कुंभार,स ह सरचिटणीसपदी महेश गजानन कुंभार, खजिनदार निलेश शिवाजी कणसे,हिशोब तपासणीस विनोद चव्हाण,सल्लागार कैलास जाधव, संघटक अविनाश जाधव, म हिला प्रतिनिधी- पूनम कारंडे, सुवर्णा लावंड,मं डलाधिकारी प्रतिनिधी मनीषा सावळकर ,मंडल प्रतिनिधी वाल्मीक भताने, अंजली धर्माधिकारी, योगेश आदलिंगे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान आज फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटना यांची नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली, सदर निवड करणे कामी महाराष्ट्र राज्य संघटना माजी उपाध्यक्ष सोडमिसे रावसाहेब , पुणे उपविभाग उपाध्यक्ष पवार प्रशांत,सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुहास अभंग, फलटण तालुका तलाठी संघटना माजी अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेणेत आली सदर निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली दरम्यान वरील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतल्यामुळे तिचे आनंदी वातावरणात निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला पण नूतन कार्य करण्याची निवड करण्यात आली वरील सर्वांचे खूप खूप आभार मानले जात असून सर्वांना पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments