Breaking News

१५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

The Supreme Court has ordered that the Zilla Parishad and Panchayat Samiti elections be held by February 15.

गंधवार्ता वृत्तसेवा दि.११ जानेवारी २०२६ - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी, असा अर्ज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वेळ दिली होती. मात्र आता न्यायालयाने मुदतवाढ देत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळत आहेत.

No comments