सौ.वैशाली कांबळे अविष्कार फाउंडेशनच्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि 12 - फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. वैशाली संदीप कांबळे यांना अविष्कार फाउंडेशनच्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आदरणीय सुरेश खराते यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
सौ.वैशालीताई कांबळे या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच सामाजिक कार्यात ही त्या अग्रेसर असतात.त्यांच्या निंबळक गावातील महिलांना त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करणे,त्यांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देणे, विविध शासकीय योजनांचे लाभ विनामूल्य मिळवून देणे अशा स्वरूपाचे काम चालू आहे. त्यांच्या या सर्व शैक्षणिक, सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम,मुख्याध्यापक श्री. काळे, उपमुख्याध्यापक श्री. माडकर , सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी वर्ग, निंबळक गावचे ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments