पद्मावती नगर फलटण येथे घरफोडी ; ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ एप्रिल - पद्मावती नगर फलटण येथे बंद घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप व मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करून, ७२ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ओमकार विद्याधर पुजारी हे वकील असून ते पुणे येथे प्रॅक्टिस करतात. त्यांचे आई - वडील पद्मावती नगर, फलटण येथे वास्तव्यास आहेत. दि.१६ एप्रिल रोजी बंगला बंद करून, आई - वडील हिमाचल प्रदेश येथे पर्यटनासाठी गेले होते. ही संधी साधून, दि. २२ एप्रिल २०२२ रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने, बंद असणाऱ्या ओमकार बंगल्याच्या सेप्टी डोअरचे कुलुप व मुख्य दरवाज्याची कडी कशाने तरी तोडुन आत प्रवेश करुन, घरामधील ७.५ ग्रॅमची ५ सोन्याची कानातली, २ ग्रॅमच्या ३ नाकातील सोन्याच्या चमक्या, २ तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट, ४ ग्रॅमच्या २ कानातील सोन्याच्या रिंगा, ३ चांदीच्या पट्यांचे जोड व रोख रक्कम १०००० रुपये असा एकूण ७२ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद ओमकार विद्याधर पुजारी यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
No comments