Breaking News

सातारा जिल्ह्यात शिवजयंती (पारंपारिक) निमित्त कलम 36 लागू

Section 36 applicable on the occasion of Shiv Jayanti (traditional) in Satara district
     सातारा  : संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 2 मे 2022 रोजी शिवजयंती (पारंपारिक) उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मिरवणुक कोणत्या मार्गाने  व कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे  वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा  सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असेल तर अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देण्याकरिता  व ढोल, ताशे इतर वाद्ये वाजविण्याचे विनियमन करुन नियंत्रण ठेवणे आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे या करीता  पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकारांचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा. पोलीस निरीक्षक, सर्व पालीस उप निरीक्षक यांचेसह बंदोस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दि. 2 मे 2022 रोजीचे 00.00 ते 24.00 वा. पर्यंत त्या – त्या  पोलीस ठाणेच्या हद्दीत सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

No comments