Mother kills 5-month-old Child; Incident at Tardgaon
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ एप्रिल - पांढरी, तरडगाव ता.फलटण येथे ५ महिन्याच्या लहान चिमुरड्याला, जन्मदात्या आईने ब्लँकेटमध्ये गुंडाळुन उशीने, नाक तोंड दाबुन जिवे ठार मारुन खुन केला असल्याचे पोलिसांना स्वतः आईनेच सांगितले असून, आई विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. २३ एप्रिल रोजी २०२२ रोजी मौजे पांढरी तरडगाव ता.फलटण गावातील सौ.आरती सोमनाथ गायकवाड हिने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन, मी माझ्या पाच महिण्याच्या लहान बाळाला जिवे ठार मारुन, त्यास पुरलेले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा. नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचातरी खुन करीन असे सांगितले. लोणंद पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार एएसआय वळवी यांनी, त्वरित तरडगाव येथे महिला पोलिसासह २ पोलिसांना घटनास्थळावर पाठवले. पथक तरडगाव येथे येऊन आरती गायकवाड यांच्या घरी गेले. तिथे घरात आरती सोमनाथ गायकवाड त्यांचा मुलगा अभिनव सोमनाथ गायकवाड व तिचे नंणंदेची मुलगी गायत्री पवार व दिराची मुलगी कविता दत्तात्रय गायकवाड, असे बसले होते. आरती गायकवाड यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता, दि.१२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहते घरातील हॉलमध्ये तिच्या मांडीवर असणाऱ्या लहान मुल कार्तिक सोमनाथ गायकवाड वय ५ महिने, याला ब्लँकेटमध्ये गुंडाळुन, उशीने नाक तोंड दाबुन जिवे मारुन टाकले आहे असे सांगितले. पोलिसांनी सदर बाळाच्या ठावठिकाणाबाबत तेथे असलेले मुलांना विचारले असता त्यांनी लहान बाळ कार्तिक हा घरात नाही असे सांगितले. प्रथमदर्शी सदरचा प्रकार हा खरा घडला असल्याचे दिसुन येत असल्यामुळे, दि. २३ एप्रिल रोजी लोणंद पोलिसांनी आरती गायकवाड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

No comments