Breaking News

फलटण शहर व तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण १००% पेक्षा अधिक

More than 100% pulse polio vaccination in Phaltan city and taluka

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ : फलटण शहर व तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली असून १०० % पेक्षा अधिक काम झाले आहे. तरीही २१४ विशेष पथकांद्वारे शहर व तालुक्यातील सर्व ७४६७० कुटुंबांचे फेर सर्वेक्षण आगामी ३ दिवस करुन पोलीओ डोस घेण्यापासून वंचित बालकांना लगेच डोस देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी सांगितले.

   फलटण शहर व तालुक्यात ० ते ५ वयोगटातील २९ हजार १४ अपेक्षीत लाभार्थ्यांपैकी २८ हजार ६३५ लाभार्थ्यांना म्हणजे ९९ % लाभार्थ्यांना पोलीओ डोस देण्यात आला आहे.

       बरड प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ४३७९ लाभार्थ्यांपैकी ४७७२ म्हणजे १०९ %, तरडगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ३३३३ लाभार्थ्यांपैकी ३६२७ म्हणजे १०९ %, बिबी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील २८२१ लाभार्थ्यांपैकी २७२८ म्हणजे ९७ %, गिरवी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ४२६५ लाभार्थ्यांपैकी ४५७३ म्हणजे १०७ %, साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील २७२४ लाभार्थ्यांपैकी ३१३० म्हणजे ११३ %, राजाळे प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ५३१० लाभार्थ्यांपैकी ५१५२ म्हणजे ९६ %,

फलटण प्रा. आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ५८२१ लाभार्थ्यांपैकी ४६५३ म्हणजे ७९ % काम झाल्याचे डॉ. विक्रांत पोटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments