प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या शोधनिबंधास द्वितीय क्रमांक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या 'नवदोत्तरी मराठी कादंबरीतील कृषी जीवन ' या विषयावरील शोधनिबंधास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर (शिविम) व न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त सहभागाने '१९९० नंतरची मराठी कादंबरी' या विषयावर अंतर विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने विविध उप विषयावर शोधनिबंध लेखन स्पर्धा ठेवण्यात आली होती. सदर स्पर्धेत शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील बहुसंख्य शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या 'नवदोत्तरी मराठी कादंबरीतील कृषी जीवन' या विषयावरील शोध निबंधास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
नवदोत्तरी काळात काही कादंबरी कारांनी शेतीशी संबंधीत विविध समस्या मांडल्या आहेत. आस्मानी व सुलतानी संकटांबरोबरच राजकारण, औद्योगीकीरण, यांत्रिकीकरण अनियंत्रित बाजारभाव व कौटुंबिक कलह अशा समस्याचे चित्रण या कादंबरीतून प्रकट झाले आहे. या समस्यांमुळे कृषी जीवन कशाप्रकारे प्रभावित झाले आहे याची मांडणी या शोधनिबंधात प्रा. डॉ. शिंदे यांनी केली आहे.
शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. बी. टी. शिर्के यांच्या हस्ते प्रा. डॉ. शिंदे यांना या बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शिविमचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश दुबळे, अधिवेशन अध्यक्ष प्रा. डों. अनिल गवळी, शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. शिंदे यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
No comments