वडिलांची महती सांगणाऱ्या 'जनक' चित्रपटाचे विडणी येथे चित्रीकरण
चित्रीकरण प्रसंगीअभिनेत्री पल्लवी ननावरे अभिनेते विजय पाटील यांना दृश्य समजून सांगताना दिग्दर्शक बापू बंगाळे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आईच्या मायेची महती सांगणाऱ्या 'भिकारीन' या लघु चित्रपटाच्या भरघोस यशानंतर, मुलाच्या जीवासाठी, बापानं संघर्षमय केलेला जिवाचा त्याग आणि कुटुंबासाठी प्रत्येक दुबळ्या बापाच्या आयुष्यात घडणारा दुःखद प्रसंग म्हणजेच बाप हाच खरा जनक आहे, कुटुंबातील प्रत्येक बापाची महती सांगणारा कौटुंबिक हृदयस्पर्शी असणारा 'जनक' या लघु चित्रपटाचे चित्रीकरण विडणी गाव व परिसरात नुकतेच संपन्न झाले.
जनक या लघु चित्रपटाचे कथा निर्माता अनिल कोलवडकर पटकथा,संवाद-विश्वास लोणकर, कॅमेरा-ज्ञानेश्वर घाडगे, संकलन दिग्दर्शक बापू बंगाळे यातील प्रमुख कलाकार विजय पाटील, हेमंत जाधव, सविता जाधव, पल्लवी ननावरे, अश्विनी साळवे, चैतन्य साळवे, प्रकाश पुरी, स्वप्नील देशमुख व परिसरातील कलाकार काम करीत असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments