Breaking News

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज गुणवरे येथे कलर अ‍ॅक्टिव्हिटी

Color Activity at Progressive Convent School and Junior College Gunavare

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) ८ फेब्रुवारी - सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज गुणवरे येथे  पूर्व माध्यमिक विभागात 'कलर अ‍ॅक्टिव्हिटी' घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध रंगाच्या पेपर पासून बनवलेल्या वस्तू तसेच वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस परिधान करून या कलर अ‍ॅक्टिव्हिटीला प्रचंड प्रतिसाद दिला. या उपक्रमांमध्ये एल.के.जी व यु .के .जी .च्या विद्यार्थ्यांनी विविध रंगांवर आधारित कवितांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रा मध्ये विविध रंगाच्या वस्तू चिकटवून निसर्ग देखावा तयार केला. शिक्षकांनी रंगांवर आधारित खेळ, कोडी, पझल्स असे क्रीडाप्रकार घेतल्याने मुलांचे मनोरंजन झाले व मुलांना रंगांची ओळख करून दिली.

        या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार सर , सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापिका संचालिका  सौ. संध्या गायकवाड मॅडम, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ प्रियंका पवार मॅडम, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनील आहिरे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक किरण भोसले सर, विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम यांनी केले. सौ. सुजाता गावडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर कु.आयेशा मुल्ला मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments