Breaking News

बाणगंगा नदी पुलावरील वाहतूक बंद प्रकरणी फलटण शहर व तालुका काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Phaltan City and Taluka Congress warning of agitation in case of closure of traffic on Banganga river bridge

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने  सातारा रस्त्यावर बाणग॔गा नदी वरील पुलाचे काम करण्यासाठी दि.10 फेब्रुवारी पासून वाहतूक बंद ठेवणे संदर्भात निर्णय घेतला आहे त्या विरोधात परिसरातील नागरिकांची, विद्यार्थ्यांची व रुग्णांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण यांना निवेदन देण्यात आले, जो पर्यंत, संत बापूदास नगर हनुमाननगर ,वाठार मळा, चिंगीचा मळा, फरांदवाडी व परिसरातील रहिवासी यांना फलटण कडे जाणे - येण्यासाठी साठी  हनुमान नगर कमानी मधुन मलठण येथील विटभट्टी मार्गाने जवळचा रस्ता चालू करुन देत नाही तो पर्यंत, बाणगंगा नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करु देणार नाही असा इशारा, फलटण तालुका काँग्रेस ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष दिपक दशरथ शिंदे यांनी दिला, या वेळेस, फलटण तालुका काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख उपस्थित होते.

No comments