राष्ट्रीय दुखवट्यात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर न उतरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा - अनुप शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ फेब्रुवारी - भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे शासनाकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवणे आवश्यक होते, मात्र फलटण नगरपरिषदेने असे न करता संपूर्ण राष्ट्रध्वज फडकावण्याचे काम केले आहे, हा प्रकार राष्ट्रध्वजाचा व राष्ट्राचा अपमान आहे. सबब याप्रकरणी जबाबदार पदाधिकारी अधिकारी यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान करणे राष्ट्रद्रोह करणे यानुसार पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक अनुप शहा यांनी एक लेखी निवेदनाद्वारे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, फलटण प्रांताधिकारी, फलटण तहसीलदार व पोलीस निरीक्षक फलटण यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही शहा यांनी दिला आहे.
No comments