Breaking News

फलटण तालुक्यात 17 कोरोना पॉझिटिव्ह

17 corona positive in Phaltan taluka

    फलटण दि. 8 फेब्रुवारी  -  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 17 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5  रुग्ण तर ग्रामीण भागात 12 रुग्ण सापडले आहेत.   

    दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 17 बाधित आहेत. 17 बाधित चाचण्यांमध्ये 3 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 14 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 12 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण विडणी 1,हणमंतवाडी 1, फरांदवाडी 1, सांगवी 2, सोनवडी बुद्रुक 1, वाठार निंबाळक 1, चौधरवाडी 1, जाधववाडी 1, आळजापूर 1, पिंप्रद 1, सोनवडी  खु.  1  रुग्ण बाधित सापडले आहेत.


No comments