Breaking News

फलटण नगर परिषदेची फसवणूक ; सिव्हील इंजिनिअर परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे ; नगरपरिषदेकडून गुन्हा दाखल

Fraud of Phaltan Municipal Council for obtaining civil engineer license

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ फेब्रुवारी - बनावट मार्कलिस्ट व कागदपत्रे तयार करून बी.ई.सिव्हील इंजिनिअर परवाना मिळवण्यासाठी, फलटण नगर परिषदेकडे दाखल करून, फलटण नगरपरिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण येथील प्रकाश रघुनाथ माने यांच्या विरोधात, फलटण नगर परिषदेकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण नगर परिषदेच्या फसवणुकी संदर्भात अधिक माहिती अशी की,  दिनांक १८ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाश रघुनाथ माने यांनी फलटण नगरपरिषद येथे बी.ई.सिव्हील इंजिनीयर परवान्याकरीता अर्ज केलेला होता. त्या अर्जासोबत त्यांनी पूणे युनिर्व्हसिटीचे सन १९८४  सालातील मार्कलिस्टची छायाकींत प्रत जोडली होती. सदर कागदपत्राच्या आधारे प्रकाश रघुनाथ माने यांना नगरपरिषदेने परवाना दिला.

     श्री महारूद्र कडाजी तिकुंडे रा विकासनगर संगमनगर सातारा यांनी दिनांक २६/९/२०१४  रोजी जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे प्रकाश रघुनाथ माने यांच्याविरूद्ध लेखी तक्रारी अर्ज केला होता. सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांनी, फलटण नगर परिषदेकडे अहवाल मागितला होता. त्यावेऴी नगर परिषदेने, प्रकाश रघुनाथ माने यांनी लायसंन्स काढण्याकरीता दिलेली कागदपत्रांची पडताऴणी केली असता, सदर कागदपत्रामध्ये खाडाखोड झालेली फलटण नगर परिषदेच्या निदर्शनास आले,  तसा अहवाल फलटण नगर परिषदेने, जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठविला. त्यानंतर प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखा सातारा यांच्याकडून, मुख्याधिकारी नगरपरिषद फलटण यांना संबंधितावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश झाले.

      प्रकाश रघुनाथ माने रा. जिजाई अपार्टमेंट बुधवार पेठ, फलटण यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने बी.ई.सिव्हील इंजिनीयर परवाना करिता, त्याची शैक्षणिक पात्रता नाही हे माहित असूनही स्वत:चे फायद्याकरिता खोटा व बनावट दस्तऐवज तयार करून, तो खरा आहे असे भासवून, बी.ई.सिव्हील इंजिनीयर परवाना मिळवण्याकरिता पूणे युनिर्व्हसिटीचे सन १९८४ सालातील मार्कलिस्टची छायाकींत प्रतीत खाडाखोड करून, बनावट कागदपत्र तयार करून, सदर मार्कलिस्टची छायाकिंत प्रत इंजिनीयर परवाना मिऴणेकरीता सादर करून फलटण नगरपरिषदेची फसवणूक केली असल्याची फिर्याद फलटण नगरपरिषदेकडून २४ जानेवारी २०२२ रोजी दाखल करण्यात आली आहे. 

No comments