Breaking News

16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा ; पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

Yatra of Shri Kaleshwari Devi at Mandhardev from 16th January to 1st February; Prohibition of animal sacrifice and playing of musical instruments

    सातारा  (जिमाका) : श्री काळेश्वरी देवी मांढरदेव ता. वाई येथील यात्रा 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत साजरी होणार आहे. या यात्रेत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

    2005 मध्ये मांढरदेव येथे यात्रेत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये व यात्रा शांतेत पार पाडली जावी म्हणून तसेच उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून या आदेशाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत कोणत्याही ठिकाणी पशुबळी दिला जाणार नाही यासाठी पोलीस दल व प्रशासन योग्य ती दक्षता घेणार आहे. तसेच या ठिकाणी ढोल व वाद्यांच्या आवाजामुळे शेजारी काही अनुचीत प्रकार घडला तरी काही एकू येत नसल्याने व तेही एक मागील दुर्घटनेचे कारण असल्याने मांढरदेव येथील काळेश्वरी परिसरात महाद्वार ते मंदिर व परत महाद्वार पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यासही मनाई करण्यात आली आहे.

No comments