Breaking News

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई ; २३ हजार ५०० रुपये दंड वसूल

Action taken against the citizensw andering around without mask at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ जानेवारी २०२२ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने फलटण नगर परिषद व फलटण शहर पोलिस स्टेशनकडून  सलग दुसर्‍या दिवशीही  शहरातील मुख्य चौकांमध्ये नाकेबंदी करत, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून २३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.  

    फलटण नगर परिषद व  शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने सलग दुसर्‍या दिवशीही मास्क न घातलेल्यांवर  कारवाई केली. फलटण शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गिरवी नाका, बाजारपेठ या ठिकाणी नाकेबंदी करत, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून, त्यांच्याकडून २३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.  व मास्क घालणे बंधनकारक असल्याची समज देत नागरिकांना मास्कचे वाटप केले. 

    दरम्यान  दि. ६ जानेवारी रोजी देखील  बाजारपेठेत व मुख्य चौकामध्ये विनामस्क फिरणाऱ्या ५५ नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ११ हजार रुपये दंड वसूल केला होता.

No comments