Breaking News

शारदा पुरस्कार डॉ. सौ. वीणाताई बाळकृष्ण पंडित, खंडाळा यांना जाहीर

Sharda Award announced to Veenatai Balkrishna Pandit, Khandala

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, फलटण शाखा यांच्या वतीने देण्यात येणारा शारदा पुरस्कार यावर्षी डॉ. सौ. वीणा बाळकृष्ण पंडित, खंडाळा यांना जाहीर झाला आहे.

     अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, शाखा फलटण यांच्या तर्फे प्रतिवर्षी शारदा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी ग्राहक संरक्षण क्षेत्रातील उज्वल कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. वीणा पंडित, खंडाळा यांना रविवार दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान सौ. शिल्पा शरद इनामदार भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून सौ. चारुलता विजय उपळेकर उपस्थित राहणार आहेत.

    सदर पुरस्कार लेले कुटुंबियांकडून कै. सत्यभामाबाई वा. लेले याचे स्मरणार्थ देण्यात येतो, या समारंभास संस्था सभासद व शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन फलटण केंद्र प्रमुख विजय ताथवडकर यांनी केले आहे.

No comments