Breaking News

फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट

Great meeting of senior journalist Prasanna Joshi and journalists in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ -  आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा प्रभाव ठेवून "रोख ठोक"पत्रकारिता करीत ग्रामीण भागातील विविध पत्रकारांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी सर यांची फलटण येथे ग्रेट भेट झाली, यावेळी त्यांनी फलटण येथील पत्रकारांना आपले बहुमोल असे मार्गदर्शन केले व खूप खूप शुभेच्छा दिल्या.

    यावेळी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी उपस्थित होते. या भेटीत पुढारीचे तालुका प्रतिनिधी पोपटराव मिंड, आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले, प्रभातचे तालुका प्रतिनिधी व माजी नगरसेवक अजय माळवे,दैनिक पुण्यनगरी चे फलटण तालुका प्रतिनिधी तथा देवत्व बेकर्स चे संचालक यशवंत खलाटे पाटील,धैर्य टाईम्स चे संपादक सचिन मोरे,सातारा न्यूज चे प्रतिनिधी राजेंद्र बोंद्रे,श्री हरी सुभाषित चे कार्यकारी संपादक युवा पत्रकार यश सुभाष भांबुरे उपस्थित होते.

No comments