Breaking News

फलटण शहरात घाणीचे, दलदलीचे व दलालांचे साम्राज्य - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

स्वच्छता अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करताना खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर

    The city of Phaltan is an empire of dirt, swamps and brokers - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   फलटण शहरात घाणीचे, दलदलीचे व दलालांचे साम्राज्य निर्माण आहे. या दलदलीच्या व दलालांच्या साम्राज्यामुळे फलटण शहरातील नागरिक अतिशय दुःखी आहे. शहरातील रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी याची फार मोठी दुरवस्था झाली आहे, या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे आणि त्यामुळे साथीचे रोग पसरले आहेत, परिणामतः नागरिकांना हजारो लाखो रुपये  दवाखान्याला खर्च करावे लागत आहेत, आणि एवढे असूनही कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेऊन हे घाणीचे साम्राज्य बद्दल स्वच्छ करत नाहीये त्यामुळेच आज  भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही स्वतः सुरुवात केली आहे यासाठी नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

    पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ बुथ सेवा सप्ताह निमित्त शनिवार दी. १० ऑक्टोबर २०२१ रोजी शहर स्वच्छता अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील पाचबत्ती चौक येथून केला असून संपुर्ण शहरात औषध फवारणी,गाजर गवत काढणे, पावडर फवारणी, गटर स्वच्छता, रस्ता झाडलोट करणार आहेत.

    खासदार रणजीतसिंह म्हणाले, फलटण शहरातील अस्वच्छतेमुळे डासांची निर्मीती होवून डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप अशा संसर्गजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकाला भोगावे लागत आहे. यासाठी फलटण शहराला स्वच्छ करणे हाच हेतू असून फलटण शहरातील स्वच्छतेचे काम अविरत चालू ठेवणार आहे. शहरातील ज्या भागांमध्ये कचरा निर्माण झाला असेल त्याची माहिती नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिल्यास त्याठिकाणी स्वच्छता केली जाईल. नागरिकांनी सुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून कोणतेही संसर्गजन्य रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी व नगरपालिकेने ही राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करावे असे अवाहन खासदार रणजीतसिंह यांनी केले.

    यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, शहर अध्यक्ष अमोल सस्ते महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ उषा राऊत, मुक्ती शहा, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव व नगरसेवक सचिन अहिवळे, राजेश शिंदे, वसीम मणेर  तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, व फलटण शहरातील भाजपाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी सेवा सप्ताहात सहभाग घेतला.

No comments