Breaking News

फलटण तालुक्यात 20 कोरोना बाधित ; सर्वाधिक विडणी 5

20 corona affected in Phaltan taluka;  highest in Vidani

    फलटण दि. 11 ऑक्टोबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 20 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 3 रुग्ण तर ग्रामीण भागात 17 रुग्ण सापडले आहेत.  फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक विडणी   येथे 5 रुग्ण सापडले आहेत. 

      काल  दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 20 बाधित आहेत. 20 बाधित चाचण्यांमध्ये 14 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 6 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 3 तर ग्रामीण भागात 17 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात विडणी 5,  हिंगणगाव 1, ठाकुरकी 2, जावली 1, चौधरवाडी 1, कोळकी 1, कांबळेश्वर 1, मुरूम 1,  जावली 1,  निरगुडी 1,शिंदेवाडी 2 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments