Breaking News

सूर्या इलेक्ट्रॉनिक्स फलटण शाखेचे मंगळवारी खा. रणजितसिंह यांच्या हस्ते उदघाटन

    Inauguration of Surya Electronics Phaltan Branch by MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ ऑक्टोबर -   इलेक्ट्रॉनिक शेत्रातील लोकप्रिय नाव असणाऱ्या सुर्या इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या फलटण शाखेचा (साई प्लाझा , डी.एड. चौक अवि एजन्सी ) उदघाटन समारंभ मंगळवार दिनांक १२ आक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता,  माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  व सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ऍड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर याच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.

    “सुर्या इलेक्ट्रॉनिक्स” इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे.  सुर्या इलेक्ट्रॉनिक्स च्या थरमॅक्स चौक, भोसरी, वाकड, चाकण, मंचर, नारायणगाव,  शिरूर, माणिकबाग, सिंहगड रोड, अशा ९ शाखेनंतर फलटणमध्ये  साई प्लाझा, डी.एड. चौक अवि एजन्सी  या ठिकाणी १० व्या शाखेचा शुभारंभ होत आहे.

    सुर्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ऑनलाईन खरेदी पेक्षा स्वस्त वस्तू मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. मोबाईल आणि लॅपटॉप खरेदीवर प्रथमच 0 % फायनान्स व्याज दर मिळणार आहे. १५ हजार रुपयांच्या मोबाईल खरेदीवर ५% कॅशबॅक,फेस्टिवल ऑफर अशा विविध ऑफर ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

    सुर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या उदघाट्न समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन सुर्या इलेक्ट्रॉनिकचे चेअरमन रमेश चौधरी, अवि एजन्सीचे संस्थापक विष्णू सूळ, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स एस कुमार वडेवाले ( चॅनेल पार्टनर ), तसेच एस.एस. मोबाइल & इलेक्ट्रॉनिक फ्रेंचाईजी पार्टनर सौ . सरला विष्णू सुळ यांनी केले आहे.

No comments