Breaking News

थकीत ऊसबिल न दिल्यास दसऱ्याला 'शरयू' वर शिमगा आंदोलन - स्वाभिमानी शेतकरी संघटना

 If  sugercane payment  is not given  then Shimga agitation on Dussehra at Sharyu

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल व्याजासह १५ ऑक्टोबर पर्यंत न दिल्यास शरयू कारखान्यावर शेतकऱ्यांना घेऊन दि. १५ ऑक्टोबर  दसऱ्याला शिमगा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, शरयु अँग्रो इंडस्ट्रीज ऊस कारखान्याला देण्यात आला आहे.

    सन २०२० - २१ या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसाचे बिल,शरयु अँग्रो इंडस्ट्रीजने अदा केले नसल्याच्या अनेक तोंडी व लेखी तक्रारी विशेष करून सातारा, कोरेगाव, वाई, व इतर येथील प्राप्त झाल्या आहेत, अनेक शेतकऱ्यांना उशीरा, अपुर्ण बील देऊन ऊस नियंत्रण कायदा १९६६ चा अध्यादेश चा वारंवार भंग करत असल्याचे दिसून आले आहे. शेतकरी अगोदरच अनेक संकटाना तोंड देत पिक व इतर कर्ज काढून शेतमाल पिकवतो व आपण कायदा न पाळता  ऊसबिल न दिल्याने शेतकऱ्यांची चुक नसताना, तो  मनस्ताप व आर्थिक संकटात व्याजाच्या व कर्जाच्या बोजाखाली दबतो आहे. तरी येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत जर आपण शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल व्याजासह न दिल्यास, शरयु अँग्रो इंडस्ट्रीज ऊस कारखान्यावर सर्व शेतकऱ्यांना घेऊन दि. १५ ऑक्टोबर ला विजयादशमी दसरा दिवशी, ऐन सनाला शिमगा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

No comments