फलटण तालुक्यात 20 कोरोना बाधित ; सर्वाधिक कुरवाली बु. 4
फलटण दि. 15 ऑक्टोबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 20 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 4 रुग्ण तर ग्रामीण भागात 16 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक कुरवाली बु. येथे 4 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 20 बाधित आहेत. 20 बाधित चाचण्यांमध्ये 17 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 3 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 16 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात बरड 1, कुरवाली बु. 4, हिंगणगाव 2, निंबळक 1, दुधेबावी 1, वडजल 1, गोखळी 3, रावडी 1, राजुरी 1, कासारवडी त. माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
यामध्ये काही फलटण तालुक्याबाहेरील व्यक्ती आहेत, परंतु त्यांनी कोरोना चाचणी फलटण तालुक्यात केली असल्यामुळे त्यांचा इथे उल्लेख करण्यात आला आहे.
No comments