श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते आज साईरत्न फॅमिली गार्डनचे उदघाटन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ ऑक्टोबर - विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर शुक्रवार, दिनांक १५/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते साईरत्न फॅमिली गार्डनचे उदघाटन संपन्न होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितिचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बारामती नगर परिषदेचे सदाशिवबापू सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर (निंबाळकर) सभापती, महाराजा व सद्गुरु उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व नगरसेवक सचिन सुभाषराव सुर्यवंशी-बेडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलींदआप्पा नेवसे, वाठार निंबाळकर सरपंच सौ. शारदा भोईट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साईरत्न फॅमिली गार्डनचे उदघाटन विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर सकाळी ११ वाजता, फलटण-सातारा रोड, नजिक फरांदवाडी, फलटण जि. सातारा येथे होत आहे. तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती सौ. नलीनी शिंदे, श्री. जगन्नाथ बहिरु शिंदे, सौ. विजया शिंदे श्री. अशोक बहिरु शिंदे सौ. अश्विनी शिंदे व अदित्य अशोक शिंदे यांनी केली आहे.
No comments