वहिवाट करण्यास विरोध केल्यामुळे मारहाण ; कुरवली बु. येथील 9 जणांवर गुन्हा दाखल
फलटण दि.४ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे कुरावली बु. ता फलटण येथील गगणधुळी या शेतामध्ये ट्रॅक्टर ने वहिवाट करीत असणाऱ्या इसमास, तुम्ही आमच्या जमिनीत वहिवाट करू नका असे म्हणाल्याच्या कारणावरून कुरवली बु. येथील सचिन अंकुश जेडगे यांना काठी व कोयत्यासारख्या हत्याराने मारहाण करून त्यांच्या आईस शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी, कुरवली बुद्रुक ता. फलटण येथील आठ ते नऊ जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गंभीर मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कुरावली बु. ता फलटण गावचे हद्दीत गगनधुळी नावाचे शेत सचिन अंकुश जेडगे व कुटुंबीयांनी वीस वर्षापूर्वी खरेदी दस्ताने विकत घेतले होते. परंतु सदर जमीन अद्याप जेडगे यांच्या नावावर न झाल्याने, व सदर क्षेत्राची विक्री केल्या संदर्भात दिवाणी दावा न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान सदरच्या गगनधुळी शिवारात, दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास, अनंतकुमार बापू सूळ हे ट्रॅक्टर ने वहिवाट करीत होते, त्यामुळे फिर्यादी सचिन अंकुश जेडगे व त्याची आई असे, अनंतकुमार बापू सूळ यांना, तुम्ही आमचे जमिनीत वहिवाट करू नका, असे म्हणाले असता,1) अनंतकुमार बापू सूळ 2)अक्षय युवराज माने 3)अमोल युवराज माने 4)पंकज कैलास गुएकर 5) सोनू रामा पडळकर सर्व रा.कुरावली बु, ता फलटण जिल्हा सातारा व इतर 4 अनोळखी इसम यांनी सचिन अंकुश जेडगे व त्याच्या आईस शिवीगाळ करून दमदाटी करून, हे आमचे शेत आहे, आम्ही वहिवाट करणार, असे म्हणून आरोपी क्र 2 ते 4 यांनी हातात असणारे लाकडी काठीने व कोयत्या सारखे हत्याराने सचिन अंकुश जेडगे यास मारहाण करून त्याच्या उजव्या पायाच्या नडगीवर मारून फॅक्चर केले असल्याची फिर्याद सचिन अंकुश जेडगे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार हांगे हे करीत आहेत.
No comments