वाठार निंबाळकर येथे संशयास्पदरित्या अंधारात थांबलेल्या परप्रांतीयास अटक
फलटण दि.४ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - वाठार निंबाळकर ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा येथील चौकात आपली ओळख लपवून संशयास्पद रित्या अंधारात थांबून कोणत्यातरी मालमत्तेचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या परप्रांतीयास फलटण ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, मौजे वाठार निंबाळकर ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा येथील चौकात सत्यजित स्नॅक्स कॉर्नर हॉटेलच्या जवळ, पप्पूकुमार शंकर पासवान वय 40 वर्ष राहणार जमुनिया भागलपुर राज्य बिहार हा, आपली ओळख लपवून संशयास्पदरित्या अंधारात थांबून, कोणत्यातरी मालमत्तेचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला असताना, फलटण ग्रामिण पोलिसांना रात्रगस्ती वेळी सापडला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम 122 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक तपास महिला पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
No comments