10 व 19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 लागू
Section 34 of the Maharashtra Police Act 1951 came into force on 10th and 19th September
सातारा (जिमाका): गणेशोत्सव 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या अनुषंगाने संभाव्य धोका, लोकांच्या सुरक्षितता याबाबी विचार घेऊन विसर्जनाच्या पारंपारिक मार्गावर कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये, वाहतुकीची कोंडी होवू नये अथवा अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 प्रमाणे सातारा जिल्ह्यात 10 सप्टेंबर व 19 सप्टेंबर या दोन्ही दिवशी अनुक्रमे होणाऱ्या गणेश मुर्ती स्थापना व विसर्जन संबंधाने सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गावर दोन्ही बाजुस कोणत्याही वाहनास पार्किग करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.
No comments